मुंबई – खासदार यांचे भाषण ऐकून असं वाटतं की लहानपणी जेव्हा आपल्याला टीचर वडिलांवरती एक पान लिहायला सांगायची, उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळेंकडे स्वतःच्या वडिलांबद्दल सांगण्या पलीकडे काही नाही. जास्त हसून बोलणारी लोकं ही नेहमी खोटारडी असतात हे आजपर्यंतचा जाणवलं म्हणून खासदार सुळे जेवढ्या बोलतील तितकं त्यांच्या विरोधकांना चांगलंच आहे. असं म्हणत भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट करत सुळेंवर टीका केली आहे.
दरम्यान, “श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचे पाणी,लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी” हा बाप माझ्या एकटीचा नाही, तर माझ्यापेक्षा पक्षातील सर्वांचा जास्त आहे. माझ्या बापाच्या आणि आईच्या बाबतीत कोणीही नाद करायचा नाही, असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्ष खा.सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांसह बंडखोरांना दिला. यावेळी त्यांनी पक्षातील अनेक मुद्यावर आपलं मत मांडलं तर भाजपवर सडकून टीका केली
निलेश राणे ट्विट
खासदार सुप्रिया सुळे यांचे भाषण ऐकून असं वाटतं की लहानपणी जेव्हा आपल्याला टीचर वडिलांवरती एक पान लिहायला सांगायची, उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळेंकडे स्वतःच्या वडिलांबद्दल सांगण्या पलीकडे काही नाही.
जास्त हसून बोलणारी लोकं ही नेहमी खोटारडी असतात हे आजपर्यंतचा जाणवलं म्हणून…
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 6, 2023