Virat Kohli Instagram Earning : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने गेल्या काही वर्षांत कर्णधारपद गमावले असले तरी तो अजूनही संघाचा पाॅपुलर खेळाडू आहे. इंस्टाग्रामवर त्याची लोकप्रियता आणि ब्रँड व्हॅल्यू सतत वाढत आहे. यावर्षी तो इंस्टाग्रामच्या माध्यमातून सर्वाधिक कमाई करणारा भारतीय ठरला आहे. एका रिपोर्टनुसार, कोहलीने 2023 मध्ये इंस्टाग्रामवर एका प्रमोशनल पोस्टसाठी 11.45 कोटी रुपये चार्ज केले होते. या यादीत फुटबॉल दिग्गज ख्रिस्तियानो रोनाल्डो अव्वल आहे, त्यानंतर लिओनेल मेस्सी आहे.
दरम्यान, प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो पुन्हा एकदा इंस्टाग्रामवर सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू म्हणून निवडला गेला आहे. एका इन्स्टा पोस्टवरून तो जवळपास 26 कोटी कमावतो. रोनाल्डो सलग तिसऱ्या वर्षी इन्स्टाग्रामवर सर्वाधिक कमाई करणारा ठरला आहे. तर प्रियंका चोप्रा एका इंस्टाग्राम पोस्टसाठी 4.40 कोटी रुपये घेते. ही यादी इंस्टाग्राम शेड्युलिंग टूल हॉपर हेडक्वार्टरने संकलित केली आहे. इन्स्टाग्रामवर विराटचे 256 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.