तुळजापुर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी कोट्यवधी जनाचे आराध्य दैवत असलेल्या श्री तुळजा भवानी मातेच्या दरबारात उन्हाची चाहुल लागताच गुढी पाडव्याच्या दुसऱ्या दिवसापासुन श्री तुळजा भवानी मातेस मखमली पंख्याने वारा घालण्यास सुरुवात झाली आहे.
शेकडो वर्षापासुन चालत आलेल्या रुढी पंरपरेनुसार उन्हाळ्याची चाहुल लागताच गुढी पाडव्या च्या दुसऱ्या दिवसापासुन श्री तुळजा भवानी मातेचे सेवेदार पलंगे घराण्याकडून श्री तुळजा भवानी मातेस मखमली पंख्याने वारा घालण्याची प्रथा पंरपंरा आजतागायत चालू आहे.
रविवारी श्री तुळजा भवानी मातेची सकाळची नित्योपचार अलंकार महापुजा झाल्यानंतर सेवेदार पुजाऱ्यांकडून श्री देवीजीस मखमली पंख्याने वारा घालण्यास सुरुवात करण्यात आली. जोपर्यंत मृग नक्षञाचा पाऊस पडत नाही तो पर्यंत श्री देवीस दुपारी 1 ते 4 या कालावधीत हाताच्या मखमली पंख्याने वारा घालण्याची प्रथा परंपंरा चालु आहे. या काळात श्री देवीच्या गाभाऱ्यातील इलेक्ट्रिक वस्तु पंखा ए.सी. बंद ठेवतात.