शनिशिंगणापूर – शनी शिंगणापूर येथे बर्याच कालखंडानंतर शनी दर्शनासाठी चौथरा खुला करण्याचा निर्णय देवस्थान विश्वस्त मंडळाने आज घेतला. शनिवार सकाळी नऊ वाजलेपासून शनी भक्तांना चौथर्यावर जाऊन मुर्तीला तेल अर्पण करता येणार आहे. दरम्यान, भक्तांना चौथर्यावर जाण्यासाठी 500 रुपये देणगी मूल्य मोजावे लागणार आहे. त्यामुळे सामान्य व गरीब भक्तांना थेट मुर्तीवर तेल अर्पण करणे व दर्शन घेणे महागडे पडणार आहे. देवस्थानने घेतलेल्या पेड दर्शनाची भाविकांमध्ये उलट- सुलट चर्चा होत आहे.
शनिशिंगणापूरमध्ये पुर्वी ओल्या वस्रानेच चौथरा दर्शन घेता येत होते. भक्तांची लुटमार होत असल्यामुळे 2009 साली चौथरा दर्शन बंद केले. प्रथेचा भाग म्हणून पूर्वी या चौथर्यावर महिलांना प्रवेश बंदी होती. या विरोधात काही वर्षांपूर्वी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आंदोलन केले होते.
त्यानंतर हा चौथरा महिलांसाठी खुला करण्यात आला. मात्र, काही काळातच सुरक्षेच्या कारणास्तव सर्वांनाच चौथर्यावर प्रवेश बंद करण्यात आला. त्यानंतर करोनाकाळात मंदिर बंद होते. ते सुरू झाल्यानंतर चौथरा खुला करण्याची मागणी होत होती. त्यामुळे देवस्थानने तो खुला करण्याचा निर्णय घेतला आहे. पाचशे रुपयांची देणगी पावती घेणार्या सर्व महिला किंवा पुरुषांना चौथर्यावर जाऊन अभिषेक करता येईल, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष अध्यक्ष भागवत बानकर यांनी दिली.
आता नव्याने चौथरा भाविकांना खुला करण्याचा महत्त्वाचे निर्णय घेतला आहे. परिणामी यामध्ये सामान्य व गरिब भाविक चौथरावर जाऊन दर्शन घेण्यापासून वंचित राहणार असल्याने भाविकांमध्ये कही खुशी कही गम अशी अवस्था झाली आहे.
पेड दर्शन, पेड महाआरती
शनी दर्शन आलेल्या भाविकाला जर पहाटे व सांयकाळी महाआरती करावयाची असल्यास इतर दिवशी 11 हजार आणि प्रत्येक शनिवारी 21 हजार पेड आभिषेक पावती घेऊन महाआरती करता येणार आहे. आता 500 रुपये चौथरा दर्शनमुळे भाविकांमध्ये उलट सुलट चर्चा रंगली आहे.