मुंबई – मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने मंजूर केला आहे.
संदीप देशपांडे यांच्याविरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कलम 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या दिवशी हा गुन्हा दाखल झाला त्या दिवसापासून संतोष धुरी आणि संदीप देशपांडे हे नॉट रिचेबल आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत होते. मात्र त्यावेळी या दोन्ही नेत्यांनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. यासंदर्भातील दोन्हीबाजूचे युक्तीवाद बुधवारी पूर्ण झाले होते. त्यानंतर आज संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्यावरील अटकेची कारवाई आता टळली आहे.
दरम्यान, संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना मुंबई सत्र न्यायालयाने प्रत्येक महिन्याच्या 1 आणि 23 तारखेला पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावण्याची अट घालण्यात आली आहे. त्यांच्या चालकाला देखील जामिन देण्यात आला आहे.