Sambhaji raje : आगामी लोकसभेसाठी देशासह राज्यातही मोठ्या प्रमाणात हालचाली सुरु आहेत. जागावाटपासाठी सर्वच पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. अशात कोल्हापूर मतदारसंघाच्या जागेसाठी महाविकास आघाडीत चर्चा सुरु आहे. यादरम्यान येथे संभाजीराजे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे.
अशी चर्चा सुरु होती की, संभाजीराजे यांनी महाविकास आघाडीतील कोणत्याही एका पक्षात प्रवेश केल्यास त्यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात येईल. मात्र यावर संभाजीराजे यांनी xया सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर एक पोस्ट केली आहे. त्यामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. संभाजीराजे यांनी महाविकास आघाडीत जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
संभाजीराजे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हंटले की, “स्वराज्य पक्ष असताना इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही. राज्यातील जनतेच्या विश्वासावर महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचे भविष्य हे स्वराज्य असेल या ध्येयाने माझी व स्वराज्य पक्ष संघटनेची वाटचाल सुरूच राहणार आहे.” असे संभाजीराजे म्हणाले आहेत.
स्वराज्य पक्ष असताना इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही. राज्यातील जनतेच्या विश्वासावर महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचे भविष्य हे #स्वराज्य असेल या ध्येयाने माझी व स्वराज्य पक्ष संघटनेची वाटचाल सुरूच राहणार आहे. #LokSabha2024
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) February 1, 2024