पाकिस्तान गुगलला कोर्टात खेचणार

इस्लामाबाद – पाकिस्तानमध्ये गुगलला कोर्टात खेचण्याच्या हालचाली सुरु आहेत. लाहोर उच्च न्यायालयात अमेरिकन कंपनी गुगलविरोधात गुन्हा दाखल करण्याबाबत विचार सुरु आहे. पाकिस्तानमधील गुगल सर्चमध्ये ईश्वरनिंदा करणारी माहिती येत असल्याचा आरोप होत आहे.

लाहोर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मोहम्मद कासिम खान यांनी याविरोधात याचिका दाखल केली आहे. यावर सुनावणी करताना न्यायालयाने पाकिस्तान सरकारच्या केंद्रीय तपास संस्थेला गुगल विरोधात गुन्हा दाखल करण्याचे अधिकार आहेत का? अशी विचारणा केली आहे.

वकिल अजहर हसीब यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने ही विचारणा केलीय. या याचिकेत हसीब यांनी सरकारकडे गुगलच्या डेटाबेसमुळे सर्चमध्ये येणारी माहिती बदलण्याची मागणी केली आहे. यात म्हटलं आहे,  गुगलवर इस्लाम विरोधात सर्च केल्यानंतर अहमदी समुदायाच्या नेत्यांचं नाव दाखवलं जातंय.  पाकिस्तान सरकार ही माहिती गुगलवरुन हटवण्यात अपयशी ठरले आहे. सुनावणीच्या वेळी फेडरल इन्व्हेस्टीगेशनचे अधिकारीही उपस्थित होते.

न्यायालयाने विचारणा केल्यानंतर पाकिस्तान सरकारच्या वतीने हजर असलेल्या डेप्युटी ऍटर्नी जनरल यांनी या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारली. ते म्हणाले, इंटरनेटवर कोणत्याही प्रकारची आक्षेपार्ह किंवा ईश्वरनिंदा संबंधित माहितीविरोधात कारवाई करण्याची जबाबदारी एफआयएची आहे.

यावेळी मुख्य न्यायाधीशांनी पाकिस्तानमधील सध्याची स्थिती दिवसेंदिवस खराब होत असल्याचं मत नोंदवलं. पाकिस्तानमध्ये मुलभूत जबाबदाऱ्या देखील पूर्ण होत नाहीये. येथे नेमकं कशाप्रकारचं सरकार आहे? असा सवाल करत त्यांनी नाराजीही व्यक्त केली.

लाहोर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी या याचिकेवर सुनावणी करताना अशा प्रकारच्या प्रकरणांचा तपास करण्यासाठी एफआयएला वेगळी शाखा सुरु करण्यास सांगितले. तसेच ईश्वरनिंदा करणारा देशाबाहेर असेल तर त्याविरोधात कारवाई करण्याचे अधिकार एफआयएला आहेत का? अशीही विचारणा न्यायालयाने केली. जर गुगलवरुन आक्षेपार्ह माहिती न हटल्यास गुगलविरोधात गुन्हा दाखल करता येईल का? याबाबतही न्यायालयाने विचारणा केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.