विनामास्क प्रचार करणाऱ्या खासदाराचा शपथविधी अगोदरच मृत्यू

न्यूयॉर्क – अमेरिकेतील करोनाबाधित रुग्णसंख्येचा आकडा दोन कोटींच्या जवळपास पोहोचलाय. तर, 3 लाखांहून अधिक व्यक्तींना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिक पक्षाचे नवनिर्वाचित खासदार ल्यूक लेटलो यांचा करोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

ल्यूक लेटलो यांचं वय 41 वर्ष होते. ते लुईसियानामधून विजयी झाले होते. लुईसियानातील एका जिल्ह्यातून विजयी झाले होते. येत्या रविवारी त्यांचा शपथविधी होणार होता.

लुईसियानामधील गव्हर्नर जॉन बेल एडवर्ड यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. ल्यूक लेटलो यांच्या कुटुंबाविषयी सद्भावना व्यक्त करत असल्याचं जॉन एडवर्ड यांनी म्हटलं आहे. ल्यूक लेटलो यांच्या पश्‍चात त्यांची पत्नी जुलिया बार्नहिल आणि दोन मुलं आहेत.

ल्यूक लेटलो यांनी ट्विटरवरुन कोरोनाबाधित झाल्याची माहिती 18 डिसेंबरला दिली होती. त्यानंतर घरीच क्वारंटाईन झाले होते. मात्र, प्रकृती बिघडल्यानंतर 23 डिसेंबरला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होते. अखेर कोरोनामुळे ल्यूक लेटलो यांना जीव गमवावा लागला.

प्रचारादरम्यान विनामास्क
नुकत्याच झालेल्या अमेरिकेतील निवडणुकीत ल्यूक लेटलो बऱ्याच वेळा विनामास्क आढळून आले होते. मतदानाला जाताना देखील ते विनामास्क होते. त्यानंतरच्या अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये विना मास्क आढळले होते. करोना विषाणू रोखण्यासाठी लावलेल्या निर्बंधाना देखील त्यांनी विरोध केला होता. निर्बंधांमुळे अर्थव्यवस्थेला नुकसान पोहोचते, असं ल्यूक लेटलो यांचे मत होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.