मुंबई – देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. त्यानंतर पुढील वर्षी 2024च्या सुरुवातीच्या टप्प्यात लोकसभा निवडणुका होणार आहेत. सर्व पक्ष आता जागावाटपासह आपापल्या जागा निश्चीतीच्या दृष्टीने तयारी करत आहेत.
राष्ट्रवादीचे शरद पवार यांचीही महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत मोठी भूमिका आहे. त्यांच्या आढावा बैठका शुरु असून एका बैठकीदरम्यान आपण आगामी लोकसभा निवडणुक लढवणार नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पवार यांनी निवडणुकांमधून निवृत्ती घेतली आहे का? अशा चर्चांना राजकीय वर्तुळात जोर आला आहे.
शरद पवार आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आढावा घेत आहेत. यावेळई दिंडोरी लोकसभानिहाय आढावा बैठकीत शरद पवार यांनी आगामी निवडणुक लढवणार नसल्याची माहिती समोर येत आहे.
माढ्याचा आढावा घेताना कार्यकर्त्यांनी शरद पवार यांनीच या मतदारसंघातून पुन्हा निवडणुक लढवावी अशी मागणी केली. मात्र त्यांनी निवडणुक लढवणार नसल्याचे स्पष्ट सांगितले आहे. तसेच आगामी निवडणुकांमध्ये राज्यभरात दौरे करून संघटना मजबूत करण्यावर भर देण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या.
दरम्यान, शरद पवारांनी 2009 साली बारामती सोडून माढा या मतदारसंघाताला पसंती दिली होती आणि त्या ठिकाणाहून निवडूनही आले होते. शरद पवार म्हणाले, मी आगामी लोकसभा लढवणार नाही.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात दौरे करुन संघटना मजबूत करण्यावर भर असणार आहे. पक्ष बळकट करण्यासाठी राज्यासह देशाचा दौरा करणार आहे. तसेच विरोधकांच्या इंडिया आघाडीत समन्वयासाठी प्रामुख्याने भूमिका पार पाडणार आहे. शरद पवारांनी राज्यातील प्रमुख लोकसभा मतदारसंघांच्या परिस्थितीचा आढावा घेतला.