नवदीप सैनीचे भविष्य उज्ज्वल – विराट कोहली

लॉडरहिल (फ्लोरिडा)  – भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नवोदित युवा गोलंदाज नवदीप सैनीचे कौतुक केरत त्याचे भविष्य खूप उज्ज्वल असल्याचे बोलले आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात नवदीपने भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

यावेळी बोलताना विराट म्हणाला की, नवदीपला अजून खूप मोठा प्रवास करायचा आहे. आयपीएलमध्येही त्याने चांगली कामगिरी केली होती. तो सध्या अनुभवाच्या दृष्टिकोनातून नवीन आहे, पण त्याच्याकडे चांगला गोलंदाज होण्याची क्षमता आहे. आजही त्याच्याइतकी जलद गोलंदाजी फार कमी जणांना जमते. त्यामुळे भविष्यकाळात आपले नाव भारतीय क्रिकेटमध्ये मोठे करण्याची त्याच्याकडे संधी आहे, एकंदरीत त्याचे भविष्य उज्ज्वल आहे. विराट सामना संपल्यानंतर बोलत होता.

पहिल्यांदा गोलंदाजी करताना नवदीपने विंडीजच्या 3 फलंदाजांना माघारी धाडले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कायरन पोलार्डसारखा आक्रमक फलंदाज समोर असतानाही नवदीपने सामन्याच्या अखेरच्या षटकात त्याला चकवत षटक निर्धाव टाकले. याच षटकात नवदीपने पोलार्डचा बळीही घेतला. त्याच्या या कामगिरीवर कर्णधार विराट कोहली चांगलाच खुश झाला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.