पिंपरी -पिंपळे गुरव येथे चोरट्यांनी बंद घरातील कपाटातून 11 तोळे सोने चोरल्याची घटना घडली आहे. हा प्रकार शनिवार (20) ते रविवार (दि.21) यांच्या दरम्यान घडला आहे. याप्रकरणी अंजली घनशाम गोरवाणी (वय-42 रा.पिंपळे गुरव) यांनी अज्ञात चोरट्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या बाहेर गावी गेल्या असता चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत कपाटातील 11 तोळे सोन्याचे दागिने व चांदीचे दागिने असा एकूण 2 लाख 96 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. सांगवी पोलीस पुढील तपास करीत आहेत.