करण अर्जुन हा चित्रपट नव्वदच्या दशकातील अतिशय लोकप्रिय चित्रपट होता. या चित्रपटात सलमान खान आणि शाहरुख खान मुख्य भूमिकेत दिसले होते आणि दोघांची भूमिका लोकांना खूप आवडली होती. या चित्रपटात इतरही अनेक पात्रं असली, तरी लोकांना खूप आवडलं आणि ते पात्र म्हणजे मुन्शीजी. या चित्रपटात अभिनेता अशोक सराफ मुन्शीजींच्या भूमिकेत दिसले होते. बॉलिवूड तसेच मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार कॉमेडी आणि उत्कृष्ट अभिनयाने लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करणारे अभिनेते अशोक सराफ आज लाइमलाइटपासून दूर गेले आहेत.
कोण आहेत अशोक सराफ –
अशोक सराफ यांचा जन्म 4 जून 1947 रोजी मुंबईत झाला. त्यांच्या वडिलांचा मुंबईत आयात-निर्यातीचा व्यवसाय होता. मुंबईच्या डीजीटी स्कूलमधून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. मुलाने शिक्षणानंतर चांगली नोकरी करावी, अशी अशोक यांच्या वडिलांची इच्छा होती, पण अशोक यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान त्यांनी ‘थिएटर’मध्ये प्रवेश घेतला होता. या काळात त्यांनी अनेक नाटकांमध्ये भूमिका केल्या.
कशी होती चित्रपट कारकीर्द –
अशोक सराफ यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. बॉलीवूडशिवाय त्यांनी मराठी चित्रपट आणि टीव्ही शोमध्येही काम केले आहे. अशोक सराफ यांनी करण अर्जुन, ‘कोयला’, ‘गुप्ता’, ‘येस बॉस’, ‘बंधन’, ‘प्यार किया तो डरना क्या’, ‘बेटी नंबर 1’, ‘जोरू का गुलाम’, ‘जोडी नंबर 1’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी ‘सिंघम’सह 70 हून अधिक चित्रपटांमध्ये आपला उत्तम विनोदी स्वभाव मांडला आहे. तसेच नवरी मिळे नवऱ्याला, गंमत जंमत, अशी ही बनवाबनवी, भुताचा भाऊ (चित्रपट), आयत्या घरात घरोबा हे त्यांचे मराठी चित्रपट खुप गाजले होते.
सध्या अशोक सराफ कुठे आहेत आणि काय करतात –
अशोकजींचा शेवटचा चित्रपट सिंघम होता, त्या चित्रपटात ते अजय देवगणसोबत हेड कॉन्स्टेबल प्रभु सावळकरच्या भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट 2011 मध्ये प्रदर्शित झाला होता. यानंतर ते 2020 मध्ये ‘प्रभास’ या मराठी चित्रपटात दिसले आहेत, दरम्यान अभिनेते अशोक सराफ फिल्मी जगापासून दूर झाले आहेत आणि आपल्या कुटुंबीयांसोबत मुंबई येथे सुखमय जीवन जगत आहेत.