नवी दिल्ली – सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार डिसेंबर महिन्यात किरकोळ किमतीवर आधारित महागाइचा दर बराच कमी होऊन तो केवळ 4.59 टक्के इतका मोजला गेला आहे.
नोव्हेंबर महिन्यात किरकोळ किमतीवर आधारित महागाईचा दर 6.93 टक्के इतका होता.
महागाई वाढण्याची शक्यता असल्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने व्याजदरात कपात केली नव्हती. या आकडेवारीनुसार अन्नधान्याच्या किंमती कमी झाल्यामुळे एकूण महागाईचा दर कमी झाला आहे.
या महागाईचा दर गृहीत धरून रिझर्व्ह बॅंक पतधोरण ठरवित.े यावर्षी रिझर्व्ह बॅंकेने किरकोळ महागाईचा जर दर 4 टक्क्यांच्या आत रोखायचे ठरविले असूनही तो अजूनही त्यापेक्षा जास्त आहे.