नवी दिल्ली- औद्योगिक उत्पादन वाढावे म्हणून केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंक प्रयत्न करीत असूनही या क्षेत्रात समाधानकारक प्रगती होत नसल्याचे दिसून येत आहे.
नोव्हेंबर महिन्यातील औद्योगिक उत्पादन वाढ उणे 1.9 टक्के इतकी मोजली गेली आहे. सरकारने यासंदर्भात जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात औद्योगिक उत्पादनात 2.1 टक्के वाढ झाली होती.
मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील उत्पादकता कमी झाली आहे. त्याचबरोबर खाण क्षेत्राची उत्पादकता ढासळल्यामुळे एकूण औद्योगिक उत्पादनावर परिणाम झाला आहे. मात्र आगामी काळामध्ये औद्योगिक उत्पादन वेगाने वाढेल असे सरकारला वाटते.