Gautami Patil : लावणी कलावंत गौतमी पाटीलला आतापर्यंतचा सर्वात मोठा पुरस्कार देण्यात आला आहे. खान्देश कन्या म्हणून तीचा गौरव करण्यात आला आहे.
यासंदर्भात गौतमीने एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये तीने म्हंटले आहे की, ”माजी मंत्री तथा आमदार मा. श्री. जयकुमारभाऊ रावल यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार मा. श्री. जयकुमारभाऊ रावल यांच्या हस्ते माझा खान्देश कन्या म्हणून गौरव करून सत्कार करण्यात आला. त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे, असाच मायेचा हात सदैव माझ्या पाठी राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना… जय खान्देश! असे गौतमीने म्हंटले आहे.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर गौतमीच्या लावण्यांनी धुमाकूळ घातला आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना ती परिचित झाली आहे. काही लावण्यांमध्ये तीने केलेल्या अश्लील हावभावावरून तीच्यावर जोरदार टीकाही झाली आहे. अनेकांनी तीला सुनावल्यानंतर तीने अनेकदा माफी मागून पुन्हा चुका होणार नसल्याचे तीने म्हंटले मात्र तरीदेखील ती लावणीदरम्यान अश्लील हावभाव करताना दिसते. आणि त्यामुळेच तीचे व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असतात.
View this post on Instagram
अनेकजण तीच्यावर टाकी करत असेल तरी तीला आता मोठा सन्मान मिळाला आहे. ती मूळची खान्देशातील आहे. धुळे येथिल आहे. त्यामुळे तिच्यासाठी खान्देश कन्या हा मोठा बहुमान असल्याचे तीने म्हंटले आहे.