पुणे – ज्येष्ठ नागरिकाचे रिक्षात विसरलेले सोने व रोख अवघ्या दोन तासात फरासखाना पोलिसांनी सापडून दिली. या ज्येष्ठ नागरिकाने फरासखाना पोलिसांचे आभार मानले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार श्रीराम भोपाळ रिसबुड(76,रा.कसबा पेठ) यांनी रिक्षामध्ये 8.50 ग्रॅम सोने व 20 हजार रुपयांची रोकड विसरल्याची तक्रार फरारसखाना पोलीस ठाण्यात दिली होती.
फरासखाना पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार सयाजी चव्हाण व शिपाई आकाश वाल्मीकी यांनी तातडीने तांत्रीक विश्लेषण करत रिक्षाचा शोध लावला. ही रिक्षा नसरापुर येथील जालींदर खुटवड यांची असल्याचे समजले.
यानंतर खुटवड यांच्याशी संपर्क साधून त्यांना रिक्षामध्ये बॅग विसरल्याची कल्पना देण्यात आली. खुटवड यांनी तातडीने फरासखाना पोलीस स्टेशन गाठत रिसबुड यांची बॅग परत केली.
ही कामगिरी उपायुक्त डॉ.प्रियंका नारनवरे, सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील, पोलीस अंमलदार सयाजी चव्हाण, आकाश वाल्मीकी, रिजवान जेनिडी, मल्लीकार्जुन स्वामी, अमोल सरडे, महावीर वलटे, मोहन दळवी, सचिन सरपाले, अभिनय चौधरी, ऋषीकेश दिघे, राकेश क्षिरसागर, मयुर भोकरे यांच्या पथकाने केली.