खडसेंचे सीमोल्लघंन लांबणीवर; अनिल देशमुख-एकनाथ खडसे यांच्यात ‘खलबत’

जळगाव, दि. 17 – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चेने काही दिवसांपासून जोर धरला होता. एकनाथ खडसे आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर सीमोल्लंघन करणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, तुर्तास खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा हा मुहूर्त चुकला आहे. पण गृहमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची त्यांनी भेट घेतल्याने संप्सेस कायम आहे.

ही भेट रावेरच्या शासकीय विश्रामगृहात पार पडली. यावेळी शासकीय विश्रामगृहाबाहेर भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. यावेळी दोघांमध्ये चर्चाही झाली. मात्र, या दोघात काय चर्चा झाली. याचा तपशील दोघांनीही सांगितला नाही.

शासकीय विश्रामगृहातून हे दोन्ही नेते रावेर हत्याप्रकरणातील पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी रवाना झाले. काही दिवसांपूर्वी घडलेल्या रावेर हत्याप्रकरणात आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे. सध्या हे प्रकरण चांगलेच गाजत आहे. या पार्श्‍वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख जातीने रावेरमध्ये आले होते.

दरम्यान, एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी राज्यपाल नियुक्‍त सदस्य म्हणून विधानपरिषदेवर पाठवणार, तसेच खडसे यांना महाविकासआघाडी सरकारमध्ये कृषिमंत्रीपद मिळणार, अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र, तुर्तात खडसे यांनी राष्ट्रवादी प्रवेशावर काहीही भाष्य न करायचे ठरवल्याने या सर्व चर्चा फोल ठरल्या आहेत. परंतु, दुसरीकडे खडसे यांनीच “योग्य वेळ येईल, वाट बघा.’ असे सांगून राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेला अजूनही वाव ठेवला आहे.

मी राष्ट्रवादीत प्रवेश करणार हा मुहूर्त मीडियानेच काढला होता. मी काढला नव्हता. त्यामुळे तो चुकला. पण योग्य वेळ येईल. वाट पाहा. असे खडसे म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.