वेस्ट पाम बीच – करोनाच्या साथीमुळे ज्यांचा रोजगार बुडाला आहे, त्यांना देण्यासाठीच्या बेरोजगार भत्त्यासाठीच्या विधेयकालाही ट्रम्प यांनी ऐनवेळी नकार दर्शवला आहे. ट्रम्प यांनी ऐनवेळी या मदतीच्या विधेयकावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला आहे.
त्यांच्याकडे विधेयक पाठवण्यापूर्वीपर्यंत हे विधेयक जवळ जवळ मंजूर मानले जात होते. मात्र ट्रम्प यांच्या ऐनवेळच्या नकारामुळे हे विधेयक खोळांबले आहे. ट्रम्प यांनी कोविड मदतीसाठी अधिक संख्येच्या पॅकेजची मागणी केली असल्याने मदतीचे पॅकेज रविवारीही मंजूर होऊ शकले नाही.
जर व्यापक प्रमाणावर मदतनिधीला मंजूरी मिळू शकली नाही, तर मंगळवारी रात्री 12 वाजल्यापासून सरकारला शटडाऊन जाहीर करावे लागू शकते.
बरोजगारंसाठीच्या मदतीच्या पॅकेजचे आश्वासन ट्रम्प यांनी अध्यक्षीय निवडणूकांच्या प्रचारादरम्यान दिले होते. त्यानुसार हे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मोठ्या फरकाने मंजूरही झाले आहे. मात्र प्रत्येक नागरिकांना 600 डॉलर ऐवजी 2000 डॉलरचे पॅकेज देण्याची मागणी ट्रम्प यांनी केली. रिपब्लिकन पक्षानेच हा प्रस्ताव फेटाळला आहे.