नागपूर – महाराष्ट्र भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, नागपूर-मुंबई समृद्धी सुपर एक्स्प्रेस वे हा आपल्याच संकल्पनेतून उभारला जात असून या प्रकल्पावरील आपले नाव कोणीही पुसून टाकू शकत नाही.या प्रकल्पाचे श्रेय लाटण्यासाठी शिवसेना शक्य तितके प्रयत्न करू शकते, परंतु ते व्यर्थ ठरेल, असे फडणवीस आज पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
या एक्स्प्रेस वेची कल्पना आणि संकल्पना गेली 20 वर्षे माझ्या मनात होती. महाराष्ट्रातील जनतेने मला मुख्यमंत्री होण्याची संधी दिली तेव्हा मी ती पूर्ण केली असे ते म्हणाले.पण आज मला आनंद होत आहे की ज्या लोकांनी या प्रकल्पाला विरोध केला होता ते लोक आता त्याचे उद्घाटन करण्यास अधीर होत आहेत,या प्रकल्पाचे सर्व काम पुर्ण झाल्यानंतरच या प्रकल्पाचे उद्घाटन केले जावे अशी सुचनाही त्यांनी केली.