आळंदी – खेड तालुक्याचे पश्चिम भागाचे भामनेहेर खोऱ्यातील नागरिकांची आळंदी-चाकण रस्त्यावरील संत ज्ञानेश्वर सेवा मंडळ धर्मशाळा असून मंगल कार्यालय (सभागृह) व भक्तनिवास उभारण्याच्या सुमारे 50 लाख रुपये खर्चाच्या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन संस्थेचे ज्येष्ठ संचालक नामदेव जाधव यांच्या हस्ते उत्साहात झाले.
या भक्तनिवास इमारतीचे बांधकामास खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी 25 लाख, आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी 15 लाख, पंचायत समितीचे माजी उपसभापती चांगदेव शिवेकर यांनी 5 लाखे, माजी उपसभापती मंदा शिंदे यांनी 2 लाख रुपये तर जिल्हा परिषदचे माजी सदस्य बाबाजी काळे यांनी 3 लाख रुपये निधी शुद्ध पाण्याच्या आरो प्लॅंटसाठी दिला आहे.
दरम्यान, भाविकांच्या सोयीसाठी तात्काळ आरो प्लॅंट सुरू करण्यात आल्याचे संस्थेचे संचालक दत्तात्रय होले यांनी सांगितले. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती खेडचे माजी सचिव सतीश चांभारे, पंचायत समितीचे माजी सदस्य रोहिदास गडदे, तुकाराम सावंत, दामोदर आहेरकर, किसन नवले, गिरजू चांभारे, शंकर साबळे, गबाजी खेडेकर, प्रभाकर देवाडे, बबन शिवेकर, तुकाराम गडदे, सिताराम लोहोट, गणपत शिंदे, लक्ष्मण तुपे, रामदास शिवेकर, धोंडीबा शिंदे, योगेश पवार, वामन जढर यांच्यासह भाविक उपस्थितीत होते.