पुणे (प्रतिनिधी) : संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेला लॉकडाऊन तीन मेनंतर वाढविण्यात आला नाही तर उच्च न्यायालयालाप्रमाणे जिल्हा न्यायालयाला असलेली एका महिन्याची उन्हाळी सुटी रद्द करण्यात येणार आहे. याबाबतचे परिपत्रक गुरुवारी मुख्य जिल्हा न्यायाधीश एन. पी. धोटे यांनी जारी केले आहे.
जिल्हा न्यायालयात सध्या काही ठराविक कोर्ट हॉलमध्ये सोशल डिस्टन्सिंगमुळे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी सुरु आहे. त्यामध्ये केवळ महत्त्वाचा प्रकरणांवर सुनावणी होत आहे.
सुनावणीच्या वेळा मात्र आहे त्याच ठेवण्यात आल्या आहेत. न्यायालयातील अधिकारी, कर्मचारी आणि वकिलांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे परिपत्रकात नमूद आहे.