वॉशिंग्टन – भारतीय रूपयाचे सध्या वेगाने अवमूल्यन होते आहे, त्या विषयी संपुर्ण देशभर चिंतेचे वातावरण असताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मात्र या विषयी अजब युक्तिवाद केला आहे.
सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या अर्थमंत्री सीतारामन यांनी तेथील एका पत्रकार परिषदेत म्हटले आहे की, भारतीय रूपयाचे अवमुल्यन होते आहे असे मला वाटत नाही, रूपया घसरत नसून डॉलर मजबूत होतो आहे त्यामुळे तुम्हाला रूपयाची िंकंमत कमी झालेली दिसते आहे असे त्यांनी म्हटले आहे. मात्र रूपयाची घसरण रोखण्यासाठी रिझर्व्ह बॅंक सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याची पुष्टीही त्यांनी यावेळी जोडली.
भाजपला अंधेरी पोटनिवडणूक ‘जड’ जाणार; ही 3 मुख्य कारणे असू शकतात https://t.co/l5RG305vcY
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) October 16, 2022
आज येथील एका पत्रकार परिषदेच्यावेळी एका पत्रकाराने त्यांना या विषयी प्रश्न विचारला होता. भारतीय चलनापुढे सध्या आव्हानात्मक स्थिती निर्माण झाली आहे त्या स्थितीला तुम्ही कसे सामोरे जाल असा त्याचा प्रश्न होता. त्यावेळी त्यांनी रूपयाची किंमत घसरत असल्याचा दावाच प्रथम धुडकावून लावला.
त्या म्हणाल्या की उदयोन्मुख अर्थव्यवस्थांतील चलनांच्या स्थितीची तुलना करता भारतीय रूपयाची किंमत मजबूत असल्याचे दिसत आहे. पण केवळ डॉलर मजबूत होत असल्याने रूपयांची किंमत घसरल्यासारखे दिसत आहे असा युक्तिवाद करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.