मुंबई – भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या अंगठ्याला झोपेत असतानाच दुखापत झाली आहे. सध्या त्यांचे हाताला बॅंडेज केलेले फोटोही व्हायरल झाले आहेत. झोपेत नक्की काय झालं ज्यामुळे लाड यांचा अंगठा मोडला? हे जाणून घेतल्यावर तुम्हालाही हसू येईल.
स्वप्नात हातापायी करताना मोडला अंगठा –
मिळालेल्या माहितीनुसार, प्रसाद लाड हे रात्री झोपेत असताना त्यांना एक स्वप्न पडलं. या स्वप्नात ते महाविकास आघाडीच्या नेत्यांशी दोन हात करत असल्याचं त्यांना वाटलं. झोपेत असतानाच त्यांनी हातापायीला सुरुवात केली. यात त्यांचा हात बेडच्या मागील भींतीवर गेला आणि अंगठ्याचं हाड डिसलोकेट झालं. त्यानंतर त्यांच्या हाताला हाताला बँडेज कराण्यात आलं आहे.
प्रसाद लाड हे भाजपच्या आक्रमक आमदारांपैकी एक म्हणून ओळखले जातात. तसेच ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणूनही ओखळले जातात. महाविकास आघाडीतील एखाद्या नेत्याने भाजपवर टीका केल्यास प्रसाद लाड त्या नेत्याला जोरदार प्रत्युत्तर देत असतात.