मुंबई – शिवसेना नेते संतोष परब हल्ल्याप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांना सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर ते गुरुवारी न्यायालयीन कोठडीतून बाहेर आले. बाहेर पडताच ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभेसाठी थेट गोव्यात गेले. तर दुसरीकडे मुंबईत समर्थकांकडून ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे.
संतोष परब यांच्यावर हल्ला केल्या प्रकरणी नितेश राणे आरोप ठेवण्यात आला आहे. त्यांना दोन दिवस सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी देखील देण्यात आली. परंतु त्यांची प्रकृती खालावल्याचे कारण पुढे त्यांना कोल्हापूरच्या सीपीआर रूग्णालयात दाखल करण्यात आले.जामीन मंजुर झाल्यानंतर नितेश राणे
यांनी थेट गोवा गाठले. तिथे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेमध्ये हजेरी लावली. भाजपचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांना पहिल्या रांगेत बसवले. तिथे त्यांनी देवेद्र फडणवीस आणि इतर कार्यकर्त्यांसोबत फोटो काढले.
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना राणे म्हणाले, माझ्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्याची सभा असल्यामुळे मी पेनकिलर्स घेऊन गोव्यात आलोय दुसरीकडे मुंबईत गुरुवारी रात्री भाजप समर्थकांनी बॅनर्स लावले होते. या बॅनसर्वर समर्थकांनी नितेश राणे यांना महान योद्धा, ब्रॅंड राणे अशी विशेषणे लावण्यात आली. परंतु, हे प्रकरण तापण्यापूर्वीच जुहू पोलिसांनी धाव घेऊन रात्री उशीरा हे बॅनर्स हटवले.