आळंदी – प्रथापरंपरेप्रमाणे दशमी दिनी माऊलींचा पालखी सोहळा अंलकापुरी दाखल होत असतो; करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी आणि यंदाही माऊलींचा पालखी सोहळा पायी न जाता एसटी महामंडळच्या बसमधून नेण्यात आल्या. दरम्यान, प्रथा परंपरेप्रमाणे मंगळवारी (दि. 3) प्रतीकात्मक स्वरूपात माऊलींच्या पालखीचे प्रथम स्वागत थोरल्या पादुका मंदिराजवळ करण्यात आले.
माऊलींचा पाखी सोहळा शुक्रवारी (दि. 2 जुलै) माऊलींचे पालखी प्रस्थान सोहळा मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत माऊली मंदिरात पार पडला. त्यानंतर 18 दिवस माऊलींच्या चल पादुका आजोळ घरी मुक्कामी होत्या. सोमवारी (दि. 19 जुलै) शिवशाही बसमधून त्या पंढरीकडे मार्गस्थ झाल्या होत्या. शनिवारी (दि. 24) त्या पुन्हा शिवसाहीतून आळंदीत परल्या होत्या; परंतु प्रथापरंपरेनुसार दशमी दिनी त्या वैष्णवांसमवेत अलंकापुरीत दाखल होत असतात त्यामुळे परंपरा खंडित न व्हावी, यासाठी प्रातिनिधीक स्वरुपात हा सोहळा मंगळवारी (दि. 3) साजरा करण्यात आला.
प्रतिकात्मक स्वरूपात माऊलींच्या पालखीचे प्रथम स्वागत थोरल्या पादुका मंदिर ट्रस्ट येथे ऍड. विष्णू तापकीर यांनी ट्रस्टच्या वतीने केले. तिथे आरती झाली पुढे ते पादुका येथे देवकृपा सर्विस स्टेशन यांच्या वतीने प्रकाश काळे यांच्या हस्ते प्रतीकात्मक पालखीचे विसावा स्थान असलेल्या ठिकाणी स्वागत करण्यात आले. त्यानंतर क्रांती महाराजांना आमंत्रित करून पालखीला दहीभाताचा नैवेद्य पाठवण्यात आला आणि हरिनाम गजरात पालखी माऊलींच्या राम मंदिर घाट मार्गे विसावली. यावेळी उपस्थित वारकऱ्यांच्या समवेत पालखीची मंदिर प्रदक्षिणा करण्यात आली.
सोहळ्याची उद्या सांगता –
माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळ्याचा समाप्ती दिवसानिमित्त बुधवारी (दि. 4) माऊली मंदिरातीला मुक्ताबाई मंडपात मानकरांना नारळ प्रसादाचे वाटप करून सोहळ्याची सांगता होणार असल्याचे देवस्थानचे प्रमुख व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले.
आळंदी (ता. खेड) : प्रथापरंपरेचे पालन करीत माऊलींच्या चलपादुकांची मंदिरातून प्रतिकात्मक मिरवणूक काढण्यात आली.