हडपसर – शिवसेना हडपसर विधानसभा मतदार संघाच्या वतीने महात्मा फुले वसाहत येथील इयत्ता दहावीतील २५ गुणवंत विद्यार्थ्यांचा पेढे व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देशमुख,उपशहरप्रमुख समीर तुपे, विधानसभा प्रमुख राजेंद्र बाबर, महिला आघाडी समन्वयक विद्या होडे, शाखाप्रमुख अमित कांबळे, योगेश जैन, निरंजन शितोळे, सूरज चव्हाण, शंतनू सातव, मनीषा वाघमारे, आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन सातववाडी व माळवाडी शिवसेना शाखेच्या वतीने करण्यात आले होते. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना कौतुकाची थाप पाठीवर दिल्याने त्यांना भविष्यात आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते त्यामुळे वेळोवेळी कौतुक केले जावे,अशी भावना यावेळी विजय देशमुख तसेच समीर तुपे यांनी व्यक्त केली.