किंसाशा (कॉंगो) – संयुक्त राष्ट्राच्या तपास अधिकाऱ्याच्या हत्येच्या आरोपाखाली कॉंगोतील न्यायालयाने तब्बल 50 जणांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.
केसाई प्रांताच्या लष्करी न्यायालयाने एकूण 54 जणांना ही शिक्षा सुनावली. यापैकी एका लष्करी अधिकाऱ्याला आज्ञेचे उल्लंघन केल्याबद्दल 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. तर उर्वरित दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. कॉंगोमध्ये 2003 पासू फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे त्यांची शिक्षा जन्मठेपेमध्ये परावर्तित केली जाणार आहे.
संयुक्त राष्ट्राचे तपास अधिकारी सिशेल शार्प आणि झिंडा कॅटलान यांची कॉंगोमधील केसाई प्रांतात 12 मार्च 2017 रोजी हत्या झाली होती. एका गटाच्या म्होरक्याच्या हत्येच्या तपासासाठी हे दोघे कॉंगोमध्ये गेले असताना लष्कराच्या एका गटाने त्यांची हत्या केली होती.