बरेलीत चमत्कार! जमीनीत गाडूनही अर्भक राहिले जीवंत

लखनऊ : देव तारी त्याला कोण मारी या उक्तीचा प्रत्यय बरेली येथे अवघ्या तीन दिवसांच्या अर्भकाला आला. तिला जमिनीत तीन फूट खोल दफन केले होते. मात्र तेथे आपल्या मृत अर्भकावर अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेल्या दाम्पत्याला या चिमुकल्या जीवाच्या रडण्याचा आवाज आला. त्यांनी सोबत आणलेल्या मजुराला खड्डा काढून या लहानगीला बाहेर काढून जवळ घेतले.

तिला कापसाच्या बोळ्याने दूध देण्याचा प्रयत्न केला. तिच्यावर आता अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तीची प्रकृती चिंताजनक आहे. या दाम्पत्याच्या मुलीच्या दफनविधीसाठी खड्डा करताना तेथील कामगारांना एक मातीचे मडके सापडले. मडक्‍यातून बाळाच्या रडण्याचा शिण आवाज आला. त्यात नुसता लंगोट बांधलेली तीन दिवसांची मुलगी होती. ती रडत होती. आम्ही तातडीने पोलिसांना बोलावलं. आम्ही थोडे दूध कापसाच्या बोळ्यात बुडवून पाजण्याचा प्रयत्न केला., असं आपल्या भावनांवर ताना मिळवत सौ. पुजा यांनी सांगितलं.

या मुलीवर रूग्णालयातील डॉक्‍टर लक्ष ठेवून आहेत. तीला थोडा ताप आला आहे. तिची प्रकृती स्थीर नाही, असं तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांनी सांगितलं. ही स्त्री भ्रुण हत्येचाच हा प्रयत्न असल्याचे स्पष्ट आहे. मात्र, ती सापडली त्यापेक्षा आता तिची प्रकृती बरी आहे, असे तेथील वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.