“खडकवासला’, “भाटघर’चे पाणी मिळवून देणार

हर्षवर्धन पाटील यांची ग्वाही : इंदापूर येथे संकल्प पत्राचे प्रकाशन

रेडा- इंदापूर तालुक्‍याचे जलव्यवस्थापन करण्यासाठी खडकवासला व भाटघर धरणाचे हक्‍काचे पाणी शेतकऱ्यांना मिळवून देणारच, व पाण्याची गरज लक्षात घेऊन शेतीसाठी आवर्तने सोडली जातील. तसेच नीरा डावा कालवा, खडकवासला कालव्याचे विस्तारीकरण करून उजनी प्रकल्पातील हक्‍काचे 9 टीएमसी पाणी बारमाही करून राखीव ठेवण्यावर भर देणार असल्याची ग्वाही हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

इंदापूर विधानसभीतील महायुतीचे भाजपचे उमेदवार हर्षवर्धन पाटील व मान्यवरांच्या हस्ते “संकल्पपत्र इंदापूर विधानसभा 2019′ चे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी भाजप तालुकाध्यक्ष नानासाहेब शेंडे, इंदापूर अर्बन बॅंकेचे अध्यक्ष भरत शहा, रिपब्लिकन पार्टीचे तालुका अध्यक्ष संदिपान कडवळे, शिवसेनेचे नितीन शिंदे, ज्येष्ठ नेते अशोक घोगरे, निलेश देवकर यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हर्षवर्धन पाटील म्हणाले की, इंदापूर तालुक्‍यात नीरा-भीमा नदीवरील बंधाऱ्यांची दुरुस्ती करणे व स्वयंचलित दरवाजे बसवणे. तसेच नीरा व भीमा नदीवर बुडीत बंधाऱ्यांची अध्यावत निर्मिती करणे व नीरा डावा खडकवासला कालवा अंतर्गत येणारे शेटफळ हवेली तसेच तालुक्‍यातील सर्व पाझर तलाव दरवर्षी पूर्ण क्षमतेने भरून घेण्यावर आगामी पाच वर्षांत काम केले जाईल.

उजनी धरणातील शासकीय उपसा सिंचन योजनेद्वारे तलाव भरणे व कालव्याद्वारे शेतीसाठी पाणी उपलब्ध शासनाच्या माध्यमातून करून दिले जाईल, तसेच तसेच लोणी देवकर येथील पंचतारांकित एमआयडीसीमध्ये नवीन कंपन्या आणून तालुक्‍यातील बेरोजगार हजारो युवकांच्या हाताला काम देण्याची चोख भूमिका पार पाडणर आहे. महिला सक्षमीकरणासाठी शिक्षित अर्ध शिक्षित महिला वर्गासाठी कौशल्य प्रशिक्षण देऊन विविध स्वरूपाचे उद्योग निर्माण केले जातील यातून लघुउद्योगांना प्रोत्साहन दिले जाईल, यासह जवळपास 22 महत्त्वाच्या विषयाला न्याय दिला जाईल. अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

  • इंदापूर तालुक्‍याचा विकासात्मक चेहरामोहरा बदलण्यासाठी व अनेक वर्षांपासून पडीक असलेल्या शेतीला मुबलक पाणीपुरवठा निर्माण करून देण्यासाठी हर्षवर्धन पाटील केवळ अनुभवाच्या जोरावर शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद फुलतील.
    – नानासाहेब शेंडे, इंदापूर तालुकाध्यक्ष, भाजप
Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)