मुंबई – आयसीसी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेनंतर भारतीय संघ न्यूझीलंडचा दौरा करणार होता. मात्र, तेथे करोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे विलगीकरणाचे नियम अत्यंत कठोर करण्यात आले आहेत. म्हणूनच हा दौरा स्थगित करण्यात आला आहे. या दौऱ्यात भारतीय संघ दोन कसोटी आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार होता.
दोन्ही देशांमध्ये आयोजित केलेली दोन कसोटी सामन्यांची मालिका आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचाच भाग आहे. हा दौरा स्थगित केल्याबाबत बीसीसीआय आणि न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.
हा दौरा 2022 सालापर्यंत स्थगित करण्यात आला आहे. करोना संसर्गाबाबत न्यूझीलंडमध्ये विलगीकरणाचे नियम अत्यंत कठोर आहेत. 2022 साली ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेनंतर हा दौरा निश्चित केला जाणार आहे.