न्यूयॉर्क- अमेरिकेची ऑलिम्पिक विजेती महिला जिमनॅस्ट सिमोन बाइल्स आणि तिच्या सहकारी खेळाडू एली राईसमॅन, मॅकायला मारोनी यांनी तत्कालीन संघाचे डॉक्टर लॅरी नासर यांनी केलेल्या लैंगिक शोषणाविरुद्ध साक्ष दिली.
खेळाडूंनी सांगितलेला जबाब ऐकून सिनेट सदस्यदेखील हादरले. एक सिनेट सदस्य व संघाचे डॉक्टर असलेल्या नासर याला जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली होती. मात्र, एफबीआयनेच हे प्रकरण दाबण्याचाही प्रयत्न केल्याचे या खेळाडूंनी सांगितले. तब्बल 300 मुलींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी नासरला दोषी ठरवले गेले होते.
सात वेळा ऑलिम्पिक पदकविजेती व तब्बल 25 वेळा जागतिक विजेती असलेल्या अमेरिकेच्या सिमोनने एफबीअयच्या तपासावर आरोप केले. याप्रकरणी केवळ नासरच नव्हे तर संपूर्ण व्यवस्था दोषी आहे. या व्यवस्थेनेच त्याला गुन्हे करण्याची सूट दिली, असेही तिने सांगितले. ही साक्ष देताना या सर्व खेळाडू रडू लागल्या आणि संपूर्ण सिनेट स्तब्ध झाली.
नासरविरुद्ध 2015 साली तक्रार नोंदवल्यानंतर देखील त्याला पुन्हा करार देण्यात आला होता व तो पुन्हा संघासोबत जोडला गेला होता. 2017 साली त्याला अटक करत तुरुंगात टाकले गेले. चार ऑलिम्पिक पदके जिंकलेल्या रईसमॅनला देखील साक्ष देताना अश्रू अनावर झाले. लैंगिक शोषणाची तक्रार करून 6 वर्षे झाली तरी मी अद्याप न्यायाच्या प्रतीक्षेत आहे, असेही तीने सांगितले.
2012 सालच्या लंडन ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकलेल्या मॅकायला मारोनीने एफबीआयचे अधिकारी हे प्रकरण दाबण्याचे काम करत होते. नासर याला 2017 साली मुलांचे पॉर्न व्हिडिओ ठेवल्याबद्दल 60 वर्षाची शिक्षा झाली होती. तसेच वेगवेगळ्या न्यायालयांकडून त्याला 175 आणि 125 वर्षाची शिक्षाही सुनावण्यात आली होती.