Ranbeer Kapoor – अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अॅनिमल’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील रणबीरच्या अभिनयाचे खूप कौतुक होत असून, अॅनिमल सध्या बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. अॅनिमलच्या यशानंतर, रणबीर कपूर लवकरच त्याच्या पुढील प्रोजेक्टच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. रणबीर कपूर नितीश तिवारी दिग्दर्शित रामायण चित्रपटात पाहायला मिळणार आहे. आता चित्रपटाच्या शूटसंदर्भात नवी माहिती समोर आली आहे.
रणबीर नितेश तिवारींच्या ‘रामायण’ सिनेमात श्रीरामाची भूमिका साकारणार हे निश्चित झाले आहे. आता रामायण विषयी नवी अपडेट समोर आली आहे. पुढील वर्षी या सिनेमाचे शूटिंग सुरू होणार असल्याचे म्हंटले जात आहे. एका चाहत्याने शेअर केलेल्या ट्वीटनंतर ही चर्चा रंगली आहे. एका चाहत्याने ट्वीट करत लिहिले आहे की, “इमिग्रेशनच्या रांगेत रणबीर कपूरला हा चाहता भेटला. तेव्हा त्याने रामायणविषयी विचारलं असता सिनेमाचं शूट पुढील वर्षी उन्हाळ्याच्या दिवसात सुरु होईल असं सांगितलं आहे. तसंच सिनेमाची स्टारकास्टही उत्तम असणार आहे,” असंही त्याने लिहिलं. मात्र अद्याप नितेश तिवारींकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
Standing ahead of Ranbir Kapoor in the immigrairon queue and talking about #Animal + his next crazy project and wasn’t something I’d signed up for this Bombay trip 😉
And what a lovely guy!
— Akshay Chaturvedi (@Akshay001) December 12, 2023
दरम्यान, नितेश तिवारी आणि मधु मंटेना यांनी ‘रामायण’ सिनेमाची जबाबदारी घेतली आहे. 2024 मध्ये तयार होणाऱ्या या रामायणाचे दिग्दर्शन नितीश तिवारी करणार आहेत. या चित्रपटात रणबीर रामच्या भूमिकेत तर साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. याआधी आलिया भट्ट सीतेची भूमिका साकारणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या पण त्यानंतर सईला दुजोरा मिळाला. आत्तापर्यंत बातमी आहे की KGF फेम यश रावणाची भूमिका साकारणार आहे. पण याबाबत अद्याप कोणतीही अधिकृतरित्या माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, रामायण या चित्रपटसह रणबीर ‘ब्रह्मास्त्र 2’ आणि ‘ अॅनिमल पार्क’ या चित्रपटांमध्ये देखील पाहायला मिळणार आहे.