महाळुंगे इंगळे – श्रीक्षेत्र महाळुंगे इंगळे, तालुका खेड येथे श्रीपती बाबा महाराज यांच्या चार दिवसांच्या कार्तिकी सोहळा निमित्त अनेक भाविक या ठिकाणी हजेरी लावतात.
या भाविकांना तसेच वारकऱ्यांना आरोग्याची कोणती समस्या भासू नये यासाठी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारा छावा ग्रुपच्या माध्यमातून आरोग्य तपासणीचे शिबिर सुरू आहे, तसेच भाविकांना पिण्यासाठी शुद्ध फिल्टरचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
भाविकांची आरोग्य तपासणी महाळुंगे इंगळे डॉक्टर असोसिएशन चे सर्व सदस्य व छावा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदीप महाळुंगकर आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी नियोजन केले आहे.