सासवडमध्ये आजपासून नवीन नियमावली; जाणून घ्या… काय सुरु, काय बंद

सासवड  -शासनाच्या सूचनेप्रमाणे सासवड शहरात (दि.30) पर्यंत लॉकडाऊनचे वेगवेगळ्या पद्धतीने निर्बंध घालण्याचे काम सुरू आहे. (दि.19) पासून नवीन नियमावली सासवड नगर परिषदेच्या वतीने जाहीर केली आहे.

लॉकडाऊनमध्ये लोक रस्त्यावर दिसत असल्यामुळे करोनाची साखळी तोडली जात नाही. म्हणून आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापारी व प्रशासनांची बैठक झाली. यात नवीन नियमावली व्यापारी व नागरिकांसाठी जाहीर करण्यात आली.

सकाळी 8 ते 1 ः किराणा दुकाने, भाजी व फळे विक्रेते, बेकरी स्वीट मार्ट, शेती उद्योग, मांसाहार विक्री (चिकन, मटण, मासळी) रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्री पार्सलद्वारे. सकाळी 7 ते रात्री 8 ः हॉटेल रेस्टॉरंट फक्‍त घरपोच व पार्सल व्यवस्था.

सकाळी 7 ते 10 संध्याकाळी 6 ते 8 ः दूध डेअरी. पूर्णवेळ बंदमध्ये ः पानालये, चहा दुकाने, (अमृततुल्य) टपऱ्या, कापड दुकाने, चप्पल, हार्डवेअर, मोबाइल शॉपी, ज्वेलर्स, जनरल स्टोअर्स व इतर आवश्‍यक सेवा सोडून सर्व दुकाने बंद राहणार असल्याचे मुख्याधिकारी विनोद जळक यांनी सांगितले.

यावेळी आमदार संजय जगताप, सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संजय चव्हाण, फळ विक्रेते संघटनेचे अध्यक्ष हरुण बागवान, शेती उद्योग भांडारचे विकास जगताप, मेडिकल असोसिएशनचे बाळासाहेब भिंताडे, उमेश जगताप, शामराव महाजन, नंदकुमार जगताप, नगर पालिकेचे आरोग्य अधिकारी मोहन चव्हाण उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.