मुंबई – राज्यातील नागरिकांना शनिवारी करोनावरील लसींचे सुमारे 8 लाख डोस देण्यात आले. राज्यातील एका दिवसातील लसीकरणाचा तो नवा विक्रम ठरला आहे.
राज्यात 26 जूनला नागरिकांना 7 लाख 38 हजार 704 डोस देण्यात आले. एकाच दिवसातील लसीकरणाचा तो विक्रम आता मोडला गेला आहे. शनिवारी राज्यात 7 लाख 85 हजार 311 डोस देण्यात आले, अशी माहिती सरकारी सुत्रांनी दिली. संबंधित आकडेवारी सायंकाळी 7 वाजेपर्यंत नोंदली गेली.
त्यानंतरही काही केंद्रांवर लसीकरण सुरू होते. त्यामुळे एका दिवसातील डोसचा अंतिम आकडा 8 लाखांवर जाण्याची शक्यताही त्या सुत्रांनी व्यक्त केली. करोना लसीकरणात इतर राज्यांना मागे टाकून महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे.
राज्यात आतापर्यंत 3 कोटी 38 लाखहून अधिक डोस देण्यात आले आहेत. त्यामुळे तीन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून महाराष्ट्र लसीकरणात देशात पहिल्या स्थानावर कायम आहे.