लंडन – चंद्रावरून आलेल्या कवेड अवलितीस या नावाच्या उल्केत शास्त्रज्ञांना डॉनविल्हेमसाइट नावाचे एक उच्च दर्जाचे खनिज सापडले आहे. अमेरिकन मिनरॉलॉजिस्ट या नियतकालिकात याबाबतचे संशोधन प्रसिद्ध झाले असून या खनिजांमुळे चंद्राबाबत अधिक महत्वाची माहिती उपलब्ध होण्याची शक्यता वाढली आहे.
डॉनविल्हेमसाइट नावाच्या या खनिजात मुख्यत्वे कॅल्शियम अल्युमिनियम सिलिकॉन आणि ऑक्सिजनचे आटम्स आहेत. कवेड अवलितीस हि उल्का २०१४ मध्ये वेस्टर्न सहारा प्रदेशात सापडली होती.
ही उल्का जणूकाही पृथ्वीवर सापडणाऱ्या दगडांप्रमाणेच होती.प्रख्यात संशोधक डॉन विल्हेम यांचा सन्मान करण्यासाठी या खनिजाला डॉनविल्हेमसाइट हे नाव देण्यात आले.