पुणे – शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून, सोमवारी (दि.10) नवीन 91 करोना बाधित व्यक्ती सापडल्या. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या 2 हजार 573 वर गेली. दरम्यान, करोनाला हरवून ठणठणीत झालेल्या 69 जणांना घरी सोडले.
शहरात करोनाने 149 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत बाधितांपैकी 1 हजार 89 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या 24 तासांत 1 हजार 8 करोना संशयित व्यक्तीचे नमुने घेण्यात आले. त्यामध्ये 91 बाधित व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले. बाधितांपैकी 19 जणांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. अशी माहिती पुणे महानगरापालिका सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिली.
शहरात करोनामुळे आणखी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये सोमवारी दिवसभरात 2, तर 9 मे रोजी तिघांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.