मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी शुक्रवारी पुन्हा एकदा संपूर्ण कुटुंबासह मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिरात पोहोचले आणि त्यांनी प्रार्थना केली. यावेळी मुकेश अंबानी यांच्यासोबत त्यांचा नातू देखील होता. यावेळी आकाश अंबानी आणि त्याची पत्नी श्लोका मेहता देखील सोबत होते. आयपीएलच्या क्वालिफायर 2 मॅचपूर्वी अंबानी कुटुंबीय दर्शनासाठी आल्याचे पाहायला मिळाले.
यावेळी आकाश अंबानीचा मंदिरात प्रवेश करतानाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे आता नेटकऱ्यांनी आकाशला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. गेल्या बुधवारीही रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आपला मुलगा आकाश, सून श्लोका आणि नातू पृथ्वीसोबत सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी आले होते. तेव्हाही मुकेश अंबानी पृथ्वीला आपल्या सोबत घेऊन जाताना दिसले. त्या दिवशीही मुंबई इंडियाचा सामना होता.
अंबानी कुटुंबातील मोठी सून श्लोका दुसऱ्यांदा आई होणार आहे. यावेळी श्लोकासोबत पती आकाश, सासरे मुकेश अंबानी आणि मुलगा पृथ्वी देखील आशीर्वाद घेताना दिसले. चौघांनीही गणपती बाप्पाच्या दरबारात नतमस्तक होऊन लहानग्या पाहुण्यांच्या सुखासाठी प्रार्थना केल्याचे समजते. मात्र अशात आकाशला नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.
View this post on Instagram
मंदिरात प्रवेश करताना आकाशने पांढऱ्या रंगाची हाफ पॅन्ट आणि फिकट हिरव्या रंगाचं शर्ट घातला आहे. मंदिरात प्रवेश करतानाच आकाशचा हा पेहराव नेटकऱ्यांना चांगलाच खटकला आहे. मंदिरात हाफ पँट घालून गेला आहे. आता यावर कोणाला काही अडचण नाही का ? असा सवाल नेटकऱ्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. तसेच हा व्हिडीओ शेअर करत देव दर्शनासाठी कसं जावं कळत नाही का ? अशा कपड्यांमध्ये मंदिरात प्रवेशाला परवानगी आहे का ? असं देखील अनेकांनी विचारलं आहे.