नेटफ्लिक्सविरोधात कोणतीही तक्रार नाही- शिवसेना

मुंबई – सध्या संपूर्ण देशाचे लक्ष स्वत:कडे ओढणाऱ्या नेटफ्लिक्‍सवर आता टीकांचे सत्र सुरु झाले आहे. अमेरिकन ऑनलाईन स्ट्रीमिंग कंपनी नेटफ्लिक्‍सविरुद्ध आता तक्रार नोंदवण्यात आली आहे. नेटफ्लिक्‍स आपल्या विविध मालिकांमधून जागतिक स्तरावर भारताचे चुकीचे चित्र उभं करत असल्याचा आरोप रमेश सोलंकी या व्यक्तीने सोशल मीडियावर केला आहे. रमेश सोलंकी ही व्यक्ती शिवसेनेच्या आयटी सेलमध्ये कार्यरत असल्याचे बोलले जात आहे. मुंबईच्या एलटी मार्ग पोलीस स्थानकात रमेश यांनी नेटफ्लिक्‍सविरोधात तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, नेटफ्लिक्सविरोधात शिवसेनेने कोणतीही तक्रार केली नसल्याचे शिवसेनेने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून जाहीर केले आहे. “शिवसेना पक्षाच्या वतीने @NetflixIndia विरोधात तक्रार नोंदवली आहे ही बातमी खोटी आहे. सर्व प्रसारमाध्यमांना विनंती आहे, की जनतेची दिशाभूल करणार्‍या चुकीच्या बातम्या छापण्यापूर्वी आमच्या अधिकृत पदाधिकाऱ्यांकडून याची पुष्टी करावी”. असं शिवसेनेने ट्विटर मध्ये म्हंटल आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.