मुंबई – मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची नायिका ‘नेहा महाजन’ आपल्या बोल्ड अंदाजामुळे नेहमीच चर्चेत राहिलेली आहे. नेहाची नुकतीच वेबफिल्म नेटफ्लिक्सवर रिलीज झाली असून, ही सीरिज सध्या चांगलीच ट्रेडिंगमध्ये आहे.या वेब फिल्मचे नाव आहे एक्स्ट्रॅक्शन.
या वेबफिल्म मध्ये नेहा महाजनने न्येसा नामक अभिनेता रणदीप हुडाच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. या वेबसीरिजमध्ये क्रिस हेम्सवर्थ, रणदीप हुडा आणि पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत आहेत.
नुकतंच नेहाने या या वेबफिल्म मधील काही फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यापूर्वी सुद्धा नेहाने या चित्रपटातील काही फोटो शेअर केले होते.
बोल्ड आणि हॉट असलेली ही अभिनेत्री तितकीच हुशारही आहे. ती तिच्या फिटनेसच्या दिनचर्येकडे कधीच दुर्लक्ष करत नाही. तसेच नेहाला संगीताची सुद्धा मोठी आवड आहे.