सातारा – कॉंग्रेस मजबूत करायची असेल तर सेवा दल मजबूत करणे गरजेचे आहे, असे मत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. जिल्हा कॉंग्रेस सेवा दलाची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. याप्रसंगी आ. चव्हाण बोलत होते. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, प्रभारी श्रीरंग चव्हाण- पाटील, उदयसिंह पाटील- उंडाळकर, ऍड. विजयराव कणसे, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, महिला जिल्हाध्यक्षा सौ. अल्पना यादव, सौ. धनश्रीताई महाडिक, राजेंद्र शेलार, निवास थोरात, एस. वाय. पवार, चंद्रकांत ढमाळ, उमेश साळुंखे, संदीप चव्हाण, झाकीर पठाण, बाबासाहेब कदम, रजनीताई पवार, जयदीप शिंदे, बाळासाहेब शिरसाट, तपासे, कुंभार आदी उपस्थित होते. कॉंग्रेस सेवादलाचे काम जिल्ह्यात चांगले असून कॉंग्रसचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा कार्यकारिणीने प्रयत्न करावेत, असे आवाहन आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. यावेळी डॉ. सुरेश जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.
सेवा दलाची कार्यकारिणी
सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष म्हणून प्रतापसिंह देशमुख यांची नियुक्ती झाली. इतर कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे. उपाध्यक्ष मधुकर जाधव (उंब्रज), राजेंद्र खलाटे (फलटण), महिला जिल्हाध्यक्ष मालन परळकर, जिल्हा समन्वयक संदीप माने, महासचिव यशवंत चव्हाण (पेरले), प्रकाश फरांदे (सातारा), संजीव साळुंखे, ऍड. ज्योतीराम ढाणे, संभाजीराव उतेकर (सातारा), सचिव दिलीप जाधव (खंडाळा), उमेश चव्हाण, जिल्हा सोशल मीडिया समन्वयक हर्षद संकपाळ. सेवा दल तालुकाध्यक्ष पुढीलप्रमाणे- बाळासाहेब चौधरी (महाबळेश्वर), शिवाजीराव मोहिते (कराड दक्षिण), संजय घाडगे (कराड उत्तर), काशिनाथ पिसाळ (वाई), बाळकृष्ण वीर (खंडाळा), प्रकाश परामणे (जावळी), दादासाहेब घोरपडे (फलटण), भीमराव काळेल (माण), गणेश शिंदे (सातारा).