नवी दिल्ली : पृथ्वीवरून १४ जुलैला झेपावलेल्या चांद्रयान-३ च्या ‘विक्रम’ लँडरने चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करून नवा इतिहास घडवला. भारतीय अंतराळ संस्थेने ( इस्रो ) जाहीर केलेल्या वेळेनुसार २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजून चार मिनिटांनी चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर लँड झाले. याचा एक व्हिडीओ आता इस्रोकडून ट्वीट करण्यात आला आहे.
चांद्रयानाने ४१ दिवसांच्या प्रवासात एकदाही निर्धारित मार्गावरून न ढळता, एकही टप्पा न चुकवता चंद्राला गाठले होते. तीच अचूकता बुधवारी चंद्राच्या पृष्ठभागावार उतरताना दिसून आली. इस्रोने केलेल्या ट्वीटवर लिहिलं की, “चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताना लँडरच्या कॅमेराने दृष्य टिपलं आहे.”
#WATCH | Chandrayaan-3 Mission | "Here is how the Lander Imager Camera captured the moon's image just prior to touchdown," ISRO tweets."
(Video: ISRO) pic.twitter.com/bJ9uaJ8Kg0
— ANI (@ANI) August 24, 2023
दरम्यान, अमेरिका, चीन, रशिया या बलाढ्य देशांच्या कोट्यवधी डॉलर रुपयांच्या अनेक मोहिमांमधून जे साध्य झाले नाही, ते अवघ्या सहाशे कोटी रूपयांत ‘इस्त्रो’च्या शास्त्रज्ञांनी साध्य करून दाखवले आहे.
‘विक्रम’च्या यशस्वी लँडिंगनंतर आता त्यामध्ये बसविलेला २६ किलो वजताना ‘प्रज्ञान’ हा रोव्हर चंद्रपृष्ठावर उतरेल. या स्वयंचलित रोव्हरमध्ये कॅमेऱ्यासह अन्य उपकरणे आहेत. त्याच्या मदतीने चंद्रपृष्ठावरील माती, वातावरण आदीचा अभ्यास केला जाईल.चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर असलेले पाणी, अन्य महत्वाची खनिजे यांची माहितीही ‘प्रज्ञान’च्या माध्यमातून गोळा केली जाणार आहेत.