मावळात सुनील शेळकेंची ताकद वाढली!

तळेगाव – शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जाहीर केलेला पाठिंबा, शुक्रवारच्या जाहीर सभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नाराज नेते किशोर भेगडे यांची उपस्थिती आणि सक्रिय सहभाग या दोन घटनांमुळे मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेस- एसआरपी- मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांची ताकद वाढली आहे.

मावळातून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उमेदवारीसाठी तीव्र इच्छुक असलेले किशोर भेगडे उमेदवारी न मिळाल्याने काहीसे नाराज होते. शेळके यांच्या प्रचारापासून ते अलिप्त राहिल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा होती. त्याला किशोर भेगडे यांनी आज पूर्णविराम दिला.

मावळची उमेदवारी जाहीर झाल्यापासून नगरसेवक किशोर भेगडे शुक्रवारी सुनील शेळके यांच्या प्रचारात सक्रिय सहभागी झाल्याने शेळके यांचे बळ अधिकच वाढले आहे. किशोर भेगडे यांनी या सभेत केवळ त्यांच्या कार्यकर्त्यांसह हजेरीच लावली नाही तर रोखठोक भाषण करून उपस्थितांना कामाला लागण्याच्या सूचना केल्या.

शेळकेंना मनसेचा पाठिंबा मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. आज घडलेल्या या दोन महत्त्वपूर्ण घटनांमुळे राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळके यांची ताकद वाढली असून याचा थेट परिणाम मतदानावर होणार आहे. यंदा मावळ तालुक्‍याचा कारभारी बदलणारच, अशी चर्चा
सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.