वाघोली (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सुनील टिंगरे यांचे निकवर्तीय म्हणून परिचित असणारे नगरसेवक भैय्यासाहेब जाधव यांची वाघोली आणि परिसरातील भागासाठी पालक नगरसेवक म्हणून जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिली असून त्याबद्दल वाघोली ग्रामस्थांच्या वतीने जाधव यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी वाघोलीचे राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र सातव पाटील, उच्च न्यायालयाचे वकील सचिन पठारे, वाघोली तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सचिन काळे, अतुल शिंदे, गणेश सातव पाटील, गोरख सातव ,रामदास पंडित, ह. भ. प. राजेंद्र पठारे आदी मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पूर्ण करून वाघोली मधील समस्या सोडवण्यासाठी कार्य करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले आहे.
प्रशासकीय यंत्रणेकडून तातडीने काम करून घेण्यासाठी व नागरिकांची समस्या सोडवण्यासाठी जाधव यांची मोलाची मदत होणार असल्याचे राजेंद्र सातव पाटील यांनी सांगितले.