दिल्ली :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आज दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत खा. प्रफुल पटेल, खा. सुनील तटकरे, एस. आर. कोहली यांच्यासह पक्षाच्या बंडखोर ९ आमदारांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीला कार्यकारिणी समितीचे १० सदस्य उपस्थित होते. निलंबित सदस्यांना पत्र पाठवण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे केरळचे प्रदेशाध्यक्ष तथा कार्यकारिणी सदस्य पी. सी. चाको यांनी दिल्ली येथील पत्रकार परिषदेत दिली.
ते पुढे म्हणाले की, देशात किंवा अन्य कुठेही जे कोणी पक्षाच्या विचारधारेच्या विरुद्ध जाणार त्यांना निलंबित करण्याचा पूर्ण अधिकार राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेबांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आहे.
आम्ही विचारधारा, धर्मनिरपेक्षता याबाबत कधीच तडजोड करू शकत नाही. देशाच्या विकासाच्या मुद्द्यांना प्राधान्य देणार, अशी भूमिका यावेळी त्यांनी स्पष्ट केली.