मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे माजी राज्यप्रमुख हाजी डॉ. अब्दुल गफ्फार मलिक यांचे दुःखद निधन झाले आहे. अल्पशा आजार झाल्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालावली आहे.
डॉ. अब्दुल गफ्फार मलिक हे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे ते सदस्य होते. तत्कालीन जळगाव नगरपालिका आणि नंतर जळगाव महापालिकेत नगरसेवकपदासह विविध समितींचे अध्यक्षस्थान भूषविले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचा मुस्लीम चेहरा म्हणून ओळखले जाणारे गफ्फार मलिक यांनी २०१४ साली यावल-रावेर विधानसभा मतदारसंघातून निवडणून लढविली. मात्र ते पराभूत झाले होते. २००९ ते २०१४ या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपदही समर्थपणे भूषविले होते. या कालावधीत जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचे पाळमुळे मजबूत झाली होती. तालिम-ए-अंजुमन मुसलमीन या शैक्षणिक संस्थेचे प्रदीर्घ काळ अध्यक्षपद भूषविणार्या गफ्फार मलिक यांचे शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान होते. तसेच इकरा एज्युकेशन सोसायटीचे सचिवपदही त्यांनी भूषविले होते.
मलिक यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दुःख व्यक्त करताना म्हणाले की, ”राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक सेलचे माजी राज्यप्रमुख हाजी डॉ. अब्दुल गफ्फार मलिक यांचे निधन दुःखदायक आहे.मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य राहिलेल्या डॉ. गफ्फार मलिक यांनी मुस्लीम मणियार बिरादरी तसेच तालिम-ए-अंजुमन व इकरासारख्या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातील मुस्लीम युवक-युवतींच्या उच्चशिक्षणासाठी व औद्योगिक प्रशिक्षणासाठी आयुष्यभर अथक परिश्रम केले.”
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक सेलचे माजी राज्यप्रमुख हाजी डॉ. अब्दुल गफ्फार मलिक यांचे निधन दुःखदायक आहे.
मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य राहिलेल्या डॉ. गफ्फार मलिक यांनी मुस्लीम मणियार बिरादरी तसेच तालिम-ए-अंजुमन व इकरासारख्या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून… pic.twitter.com/7V5S7cHEWq— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 25, 2021
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला शोक व्यक्त ”राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे माजी राज्यप्रमुख हाजी डॉ. अब्दुल गफ्फार मलिक यांचे दुःखद निधन झाले. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे ते सदस्यही होते. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! आम्ही त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. राजकीय क्षेत्रातील संयत तरीही आग्रही नेतृत्व त्यांच्या जाण्याने हरपले. त्यांच्या कुटुंबियांप्रति सहसंवेदना व भावपूर्ण श्रद्धांजली!”
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक
सेलचे माजी राज्यप्रमुख हाजी डॉ. अब्दुल गफ्फार मलिक यांचे दुःखद निधन झाले. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे ते सदस्यही होते. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! आम्ही त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. pic.twitter.com/jeaiSlroYi— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) May 25, 2021