NCP Ajit Pawar group Rajya Sabha : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवार जाहीर केला आहे. प्रफुल्ल पटेल हेच राज्यसभेचे उमेदवार असतील. राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या १५ फेब्रुवारी ही शेवटची तारीख आहे.
प्रफुल पटेल हे सध्या राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांचा कार्यकाळ मे 2027 मध्ये संपणार आहे. मात्र त्यापूर्वीच 3 वर्षे आधी प्रफुल पटेल हे राजीनामा देऊन पुन्हा अर्ज भरतील. | NCP Ajit Pawar group Rajya Sabha
काही तांत्रिक मुद्दे असल्याने हा निर्णय घेत आहोत, असे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले. मात्र कार्यकाळ संपण्याच्या तब्बल 3 वर्ष आधी हा निर्णय का घेतला याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याने वाद टाळण्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने हे सावध पाऊल टाकल्याचं सांगण्यात येत आहे. राज्यसभेच्या या जागेसाठी पार्थ पवार, बाबा सिद्दिकी यांच्यासह 8-10 इच्छुक उमेदवार होते. त्यामुळे इतर कोणाला उमेदवारी देऊन, लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी नाराजीनाट्य नको, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने प्रफुल पटेल यांनाच उमेदवारी दिल्याचे समजते. | NCP Ajit Pawar group Rajya Sabha