लोकसभा निवडणुकांना नक्षलवाद्यांचा विरोध; मतदारांना निवडणुकांवर बहिष्कारांचे आवाहन

गडचिरोली  -लोकसभा निवडणुकीत नक्षलवाद्यांनी मतप्रदर्शन केले आहे. धानोरा तालुक्‍यातील देवसूर येथे नक्षलवाद्यांनी बॅनर्स लावले आहेत. या बॅनर्सद्वारे लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे. तसेच उमेदवारांना नक्षली जन अदालतमध्ये उभे करण्याचे आवाहन केले आहे. भाजपने देशातील श्रमिकांचे नुकसान केल्याचा दावा नक्षलवाद्यांनी केला आहे.

जनतेविरोधी भाजपला धडा शिकवा. दलित, मुस्लीम, आदिवासी, इतर मागासवर्गीय, महिलाविरोधी भाजपला धडा शिकवा, असे नक्षलवाद्यांनी लावलेल्या पोस्टरवर म्हटले आहे. मजूर, शिक्षक आणि कर्मचारी विरोधी सरकारला पळवून लावा. मत मागायला आलेल्या सर्व पक्षांच्या नेत्यांना जनअदालतमध्ये उभे करून त्यांना प्रश्‍न विचारा, असे आवाहन नक्षलवाद्यांनी केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.