नवी दिल्ली – सत्तेवर येताच पहिल्या दिवशीच राफेल गैरव्यवहाराची चौकशी करू, असा मुद्दा काँग्रेसने आज प्रसिध्द केलेल्या जाहीरनाम्यात समाविष्ट केला असल्याची माहिती काँग्रेसच्या जाहीरनामा समितीचे सदस्य भालचंद्र मुणगेकर यांनी दिली आहे.
Bhalchandra Mungekar, member of Congress party's manifesto committee: When we will come to power, on the first day we will initiate an inquiry into Rafale deal and we have included this in the manifesto. pic.twitter.com/gIhi4U4LEd
— ANI (@ANI) April 2, 2019
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं आज जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.’हम निभाएंगे’ असं म्हणत काँग्रेसनं हा जाहीरनामा प्रसिद्ध केला.
दरम्यान, राफेल प्रकरणावरून कायम सत्ताधारी-विरोधक आमने सामने येत असतात. राहुल गांधीनी सत्ताधाऱ्यांना कायम या प्रकरणावरून कोडींत पकडले आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणूकीत हा मुद्दा आपल्या पक्षासाठी महत्वाचा ठरू शकतो, यासाठी काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात राफेलचा मुद्दा मांडला आहे.