शेवगाव – शारदीय नवरात्रोत्सवाच्या घटस्थापनेला देवस्थाने खुली झाल्याच्या आनंदात श्री क्षेत्र अमरापूरच्या श्री रेणुका माता देवस्थानात ठिकठिकाणचे अनेक भाविक ‘उदे गं अंबे उदे ‘, ‘जय जगदंब’ चा जय घोष करत पायी दर्शना साठी येत आहेत. आज पाचव्या माळेला सकाळपासून हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.
आज दिवसभरात तारकेश्वर गडाचे महंत शांतिब्रह्म आदिनाथ महाराज शास्त्री, हनुमान टाकळीचे महंत रमेश अप्पा महाराज, जोग महाराज संस्कार केंद्राचे प्रमुख राम महाराज झिंजूर्के, पाथर्डीचे प्रथम नगराध्यक्ष सुभाष घोडके, डॉ. भाऊसाहेब लांडे पाटील, उद्योगपती रसिकलाल कोठारी, विजय पोटफोडे, अरुण बोरुडे, श्रीमंत घुले, प्रा . जनार्दन लांडे पाटील, चंद्रकांत गायकवाड, बाळासाहेब चौधरी, हरिचंद्र मोरे यांचे सह अनेक भाविकानी दर्शनाचा लाभ घेतला.
आज ललिता पंचमी निमित्त नवकन्या पूजन व देवीचे महाअर्चन तसेच देवस्थानचे प्रणेते चंद्रकांत दादा भालेराव यांचे तिसऱ्या पुण्यस्मरणानिमित् विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सकाळी ११.३० ला महा नैवेद्य व महाआरती सायंकाळी ५ ला संगित राजोपचार त्यानंतर ६ .३० ला महा नैवेद्य व महाआरती, रात्री अष्टकं व छबीना काढण्यात आला. दि. १२ ला शतचंडी याग व अंगभूत देवता स्थापना करण्यात येणार आहे.
बुधवारी दि १३ ला महा अष्टमीला सकाळी ९ ला पोलिस उपअधिक्षक सुदर्शन मुडे यांचे हस्ते शतचंडी हवनास प्रारंभ करण्यात येणार आहे. संध्याकाळी ६ ला नवरात्र होमास प्रारंभ होणार आहे. रात्री ८.३० नवरात्रोथ्यापन १० .३० ला पूर्णाहूती त्यानंतर महा आरती. दि .१५ ला विजया दशमीला सकाळी ८ ला महाअभिषेक, ११.३० ला महाआरती, सायंकाळी ५ ला भगवान परशुराम पालखी, सिमोलंघन व शस्त्र पुजन व ६ .३० ला महाआरती असे सोहळे आहेत.
वेदशास्त्र संपन्न सचिन देवा, तुषार देवा, देवी दास जोशी देवा पौरोहित्य करत आहेत. रेणुका मल्टिस्टेटचे प्रवर्तक प्रशांत नाना भालेराव नवरात्रोत्सवाचे पुजेसाठी बसले असून हजारो वृक्ष राईने बहरलेला श्री रेणुका माता देवस्थान परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने नटला आहे.
गेल्या काही दिवसापासून करोनाला प्रतिबंध करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊन मुळे त्रस्त झालेले भाविक स्वयं प्रेरित होऊन कोव्हिड १९ चे नियमांचे पालन करत आहेत. देवस्थानच्या वतीने देखील भाविकांना हात पाय धुण्याची, सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली असून १२ सिक्युरिटी गार्ड सुरक्षित अंतर ठेवून फक्त मास्क असलेल्या भाविकांनाच टप्या टप्याने आईसाहेबाच्या दर्शनासाठी सोडत आहेत.
याशिवाय शेवगाव पोलिस ठाण्याचे पोलिसांचाही बंदोबस्त आहे. पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी देखील देवस्थानला भेट देवून येथील व्यवस्थेची पहाणी केली आहे. भगवती भक्तानुरागी विधिज्ञ नितीन भालेराव, मंगल ताई, जयंती, योगिता, रेणुका , प्रज्ञेश, गौरी, रुद्र, व देवांश भालेराव भाविकांचे सेवेत काही कमी पडू नये यासाठी प्रयत्नशील आहेत.